पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुरक्षा दलाला मोठे यश: लष्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्याला अटक

भारतीय लष्कराचे जवान

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेचा हा दहशतवादी आहे. सोपोर भागामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी कारवाई करत दहशतवाद्याला अटक केली. 

सरकारला पूर्वीच कळवलं होतं, हेरगिरी प्रकरणावर व्हॉट्सअ‍ॅपचं स्पष्टीकरण

सोपोर भागामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेराव घालत दहशतवाद्याला अटक केली. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यामध्ये दहशत पसरवण्यासाठी परप्रांतीय नागरिकांना लक्ष्य करत आहेत. सफरचंद व्यापारी, ट्रक चालक आणि मजूरांना लक्ष्य करत त्यांची हत्या केली जात आहे. 

सत्ता स्थापण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र येतीलः शरद पवार

दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी संध्याकीळ पाच मजूरांची हत्या केली. यामध्ये एक मजूर जखमी झाला आहे. हे सर्वजण पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादचे राहणारे आहेत. ते गेल्या अनेक वर्षापासून जम्मू-काश्मीरमध्ये काम करत होते. तर २४ ऑक्टोबरला शोपिया जिल्ह्यातील चित्रगाम येथे दहशतवाद्यांनी सफरचंद घेऊन जाणाऱ्या तीन ट्रकला लक्ष्य केले. या ट्रकवर अंधाधुंध गोळीबार केला. या गोळीबारात दोन चालकांचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला. 

भाजपपेक्षा शिवसेना बरी, सेनेला पाठिंबा देण्यासाठी दलवाईंचे पत्र