पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरः दगडफेकीत स्थानिक ट्रक चालकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीर चकमक

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात रविवारी सांयकाळी झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत एका काश्मिरी ट्रक चालकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नूर मोहम्मद दार (वय ४२) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव असून तो जरादीपुरा उरानहाल परिसरातील रहिवासी होता. या घटनेवेळी नूर मोहम्मद दार हा घरी परतत होता. याचदरम्यान आंदोलकांना हा ट्रक सुरक्षादलाचा वाटल्याने त्यांनी त्यावर तुफान दगडफेक केली. दरम्यान, दगडफेक करणाऱ्या संशयिताची ओळख पटली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाच्या डोक्याला दगड लागल्यानंतर त्याला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. आंदोलकांनी सामान्य लोकांवरही दगडफेक केली. या महिन्याच्या सुरुवातील श्रीनगर शहरात दगडफेकीत ११ वर्षीय मुलाला आपला डोळा गमवावा लागला होता. दगडफेकीच्या ताज्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी अधिकाऱ्यांना आरोपींना पकडून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.