पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरः सामान्य नागरिकांबरोबर अजित डोवाल यांचे भोजन

जम्मू-काश्मीरः सामान्य नागरिकांबरोबर अजित डोवाल यांचे भोजन (ANI)

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या जम्मू-काश्मीरमध्ये असून ते सातत्याने तेथील सुरक्षेचा आढावा घेत आहेत. बुधवारी जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथे डोवाल यांनी सामान्य नागरिकांची भेट घेऊन तेथील सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी डोवाल यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्याबरोबर भोजनही घेतले. 'एएनआय'ने याबाबतचे छायाचित्र आणि व्हिडिओही शेअर केला आहे. यात डोवाल हे काश्मिरी लोकांबरोबर जेवताना दिसत आहेत.

दरम्यान, मंगळवारी अजित डोवाल यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची राजभवन येथे भेट घेतली होती. त्यांनी राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेवर चर्चा केली होती. जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक संमत होताच काश्मीर खोऱ्यावर सरकारची करडी नजर आहे. कारण सरकारने कलम ३७० संपुष्टात आणले आहे. त्यामुळे खोऱ्यात अशांततेची स्थिती होऊ नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्ता तैनात करण्यात आली आहे.

सुषमा स्वराज यांना पाहताच महाशय धर्मपाल गुलाटींना अश्रू अनावर