पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शोपियाननंतर डोवाल उतरले अनंतनागच्या ररत्यावर

अजित डोवाल

कलम ३७० हटवल्याची घोषणा केल्यापासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल हे जम्मू-काश्मीरमधील विविध भागांना भेटी देत आहेत. त्यांनी शोपियाननंतर आज (शनिवार) अनंतनागचा दौरा केला. परिस्थिती जाणून घेण्यासाठी ते रस्त्यावर उतरले. याचदरम्यान त्यांची भेट बकरी ईदसाठी मेंढी विकण्यासाठी आलेल्या मेंढपाळांशी झाली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी डोवाल यांनी शोपियान येथील रस्त्यावर सामान्य लोकांशी चर्चा करुन त्यांच्याबरोबर भोजनही केले होते.  

पैसे देऊन कोणालाही सोबत घेता येते, गुलामनबी आझाद यांची टीका

जम्मू-काश्मीरमध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. याच प्रयत्नाअंतर्गत डोवाल हे दहशतवाद प्रभावित भागात जाऊन सामान्य लोकांची भेट घेत आहेत. त्यांनी उज्वल भविष्याचे आश्वासन देत आहेत. अनंतनाग, जम्मू आणि काश्मीरनंतरचे तिसरे सर्वांत मोठे शहर आहे. यावेळी डोवाल यांनी मेंढपाळाला मेंढीचे भाव विचारले. ते कोठून आले, याची विचारणा केली. 

जम्मू-काश्मीरः सामान्य नागरिकांबरोबर अजित डोवाल यांचे भोजन

दहशतवाद प्रभावित जिल्ह्यांमध्ये सरकार काळजीपूर्वक पाऊल उचलत आहे. शुक्रवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत नमाज अदा करण्यात आली. तर उमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, सज्जाद लोन यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.