पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१५ ऑगस्टपर्यंत अजित डोवाल यांचा काश्मीर खोऱ्यात 'मुक्काम'

मोदी आणि डोवाल

मोदी सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऐतिहासिक निर्णयासंदर्भातील विधेयक राज्यसभेत मांडण्यापूर्वीच केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात मोठ्या संख्येनं फौजफाट्याचा बंदोबस्त केला होता. 
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक घटनेवर नजर ठेवून आहेत. जमाव बंदीच्या दरम्यान अजित डोवल जवान आणि जनतेशी चर्चा करत असल्याचे अनेक फोटो समोर येत आहेत. जम्मू काश्मीरमधील घडामोडींसंदर्भातील माहिती ते सातत्याने गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदींपर्यंत पोहचवत आहेत.    

स्वातंत्र्यदिनी अमित शहांचा काश्मीर दौरा ठरलाय, पण...

अजित डोवल गेल्या आठवड्यांपासूनच काश्मीर खोऱ्यात तैनात आहेत. स्वातंत्र्यदिनी राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी १५ ऑगस्टपर्यंत ते काश्मीर खोऱ्यात राहून परिस्थितीवर बारिक लक्ष्य ठेवणार आहेत. स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात कुडघोडीचे डाव आखण्यात येत असल्याची माहिती गुप्तहेर संस्थांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी ही डोवाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अजित डोवाल फक्त सुरक्षा यंत्रणेच्याच संपर्कात नाहीत तर ते जनतेशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेण्याता प्रयत्न करत आहेत.  

काश्मिरी जनतेला भेटू देणार का? राहुल गांधींचा राज्यपालांना खोचक सवाल

अजित डोवाल हे पंतप्रधान मोदींच्या विश्वासातील आहेत. गृहमंत्री अमित शहा १५ ऑगस्ट रोजी काश्मीर दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा देखील सुरु आहे. अजित डोवाल यांची काश्मीर खोऱ्यातील मुक्काम हा अमित शहांचा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरही महत्त्वपूर्ण मानला जात आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्यास शहा श्रीनगरसह लडाखचा दौराही करणार आहेत. डोवाल यांची काश्मिर खोऱ्यातील निगराणी शहांच्या दौरा पक्का असल्याचे संकेत देणारी आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: jammu and kashmir national security adviser ajit kumar doval to stay in kashmir valley till august