पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरः सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा

भारतीय लष्कर (संग्रहित छायाचित्र)

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलाला मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षादलांनी चकमकीत लष्कर ए तोयबाच्या एका मोठ्या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. आसिफ असे मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव असल्याचे सांगण्यात येते. तो लष्कर ए तोयबाचा आघाडीचा दहशतवादी होता. सोपोर येथे झालेल्या चकमकीत दोन पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. 'एएनआय'ने पोलिसांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सोपोरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये आसिफचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.

'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आसिफने सोपोरमध्ये नुकताच एका फळ व्यापाऱ्याच्या कुटुंबातील तिघांवर गोळीबार केला होता. यामध्ये आस्मा जन नावाच्या मुलीचाही समावेश होता. त्याचबरोबर शफी आलम या कामगारावर गोळीबार करण्यात याचा हात होता.