जम्मू काश्मीर येथील अनंतनागमध्ये बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले आहेत. तर एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना लष्कराकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये एका दहशतवाद्याचा खात्माही झाला आहे.
#UPDATE Total 5 CRPF personnel have lost their lives in Anantnag terrorist attack in Jammu & Kashmir, today. pic.twitter.com/sXoVnbkqzi
— ANI (@ANI) June 12, 2019
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अनंतनाग येथील केपी रोड परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात एक पोलिस अधिकारीही जखमी झाला आहे. दरम्यान दहशतवादी आणि जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरुच आहे.