जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांना काश्मीर खोऱ्यातील सत्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विमान धाडणार असल्याचे वक्तव्य केले आहे. काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याची टिप्पण्णी राहुल गांधींनी केली होती. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राहुल गांधींना शाब्दिक टोला लगावला.
J&K: ईदचा उत्सव आनंदात साजरा, मुख्य सचिवांनी गोळीबाराचे वृत्त फेटाळलं
राज्यपाल मलिक म्हणाले आहेत की, मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये आढावा घेण्यासंदर्भात निमंत्रण दिले आहे. या दौऱ्यासाठी मी तुम्हाला विमान देखील पाठवतो. याठिकाणी येऊन सद्य परिस्थितीचा आढावा घ्या, आणि त्यानंतर काश्मीरमधील घटनांवर वक्तव्य करा, असा टोला राज्यपालांनी लगावला. जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असल्याच्या बातम्या येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुद्यावर चिंता व्यक्त करायला हवी, असे राहुल गांधी यांनी शनिवारी म्हटले होते.
काश्मीरच्या वादात सरफारजही उतरला मैदानात
राज्यपाल पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यामागे कोणताही सांप्रदायिक हेतू नाही. काही लोक या मुद्याला विनाकारण वेगळा रंग देत असून त्यांना यात यश येणार नाही, असेही मलिक यांनी म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यातील एका व्यक्तीला जरी गोळी लागली असेल तर ते दाखवून द्या, असे आव्हानही त्यांनी हिंसाचाराच्या घटनावर भाष्य करणाऱ्याला दिले आहे.