पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश

जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश

जम्मू-काश्मीरमध्ये विभागीय, जिल्हास्तर आणि श्रीनगर सचिवालयातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. तात्काळ प्रभावाने सर्वांना कामावर रुजू होण्यास सांगितले आहे.

जम्मू-काश्मीर सरकारने म्हटले की, कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे म्हणून प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. 

त्याचबरोबर सांबा जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना आदेश जारी करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून सर्व खासगी आणि सरकारी शाळांसमवेत सर्व शैक्षणिक संस्था सुरु कराव्यात असे सांगण्यात आले आहे.