पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० : पीडीपी खासदाराचा कुर्ता आणि संविधानाच्या प्रती फाडून निषेध

पीडीपी खासदारांचा निषेध

जम्मू- काश्मीरला विशेष अधिकार देणारं कलम ३७० रद्द करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली आहे.  या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या ऐतिहासिक निर्णयानंतर संसदेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ सुरु झाला. 

लोकशाहीच्या इतिहासातला काळा दिवस, मेहबुबा मुफ्तींची जाहीर नाराजी

राज्यसभेत मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीचे खासदार नाझीर अहमद आणि  एमएम फय्याज यांनी कुर्ता फाडून याचा निषेध केला. तसेच एमएम फय्याज यांनी संविधानाच्या प्रती फाडण्याचा प्रयत्नही केला. पीडीपीच्या दोन्ही खासदारांना  राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. 

देशात गाजत असलेला मुद्दा कलम 370 आहे तरी काय?

आमचा या प्रस्तावास विरोध असून ही लोकशाही मुल्यांची पायमल्ली आहे अशा शब्दांत दोघांनी आपली नाराजी व्यक्त केली. तर मेहबुबा मुफ्ती यांनी हा लोकशाहीच्या इतिहासातील काळ दिवस आहे असं लिहित जाहीर नाराजी दर्शवली. काश्मीर प्रश्नी भारतानं  आपला शब्द पाळला नाही असंही त्या म्हणाल्या. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jammu and Kashmir Article 370 PDP MP Mir Mohammad Fayaz try to torn Copy of the Indian Constitution