नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला हे गेल्या दोन महिन्यांपासून नजरकैदेत आहेत. रविवारी त्यांनी प्रथमच पक्षाच्या १५ नेत्यांची भेट घेतली. सुमारे दोन महिन्यांच्या नजरकैदेनंतर जेव्हा फारुख अब्दुल्ला रविवारी नजरेस पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. पक्षाचे १५ सदस्यीय शिष्टमंडळ अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी श्रीनगरला पोहोचले. त्यावेळी हे छायाचित्र समोर आले. जम्मू-काश्मीर प्रशासनाने शनिवारी त्यांना भेटण्याची परवानगी दिली होती. कलम ३७० हटवल्यापासून अब्दुल्ला पिता-पूत्र नजरकैदेत आहेत.
विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वॉड्रनचा हवाईदलाकडून सन्मान
#WATCH National Conference (NC) leaders Hasnain Masoodi and Akbar Lone meet former J&K CM Farooq Abdullah and his wife Molly Abdullah at their residence in Srinagar pic.twitter.com/G842irK9NJ
— ANI (@ANI) October 6, 2019
पक्षाचे १५ सदस्यीय शिष्टमंडळ जम्मू प्रांतीय अध्यक्ष देवेंद्रसिंह राणा यांच्या नेतृत्वाखाली अब्दुल्ला पिता-पुत्रांना भेटायला श्रीनगरला आले. दोन्ही नेते स्वस्थ आहेत, हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. निश्चितच ते राज्यातील घडामोडींमुळे पीडित आहेत. जर राजकीय प्रक्रिया सुरु करायची असेल मुख्य प्रवाहातील नेत्यांना सोडावे लागेल, असे राणा यांनी माध्यमांना सांगितले. ८१ वर्षीय फारुख अब्दुल्ला हे श्रीनगरमधील आपल्या निवासस्थानी नजरकैदेत आहेत. तर उमर अब्दुल्ला यांना राज्याच्या गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
'गोडसे देशभक्त की मारेकरी?, मोदी-शहांनी भूमिका स्पष्ट करावी'
A National Conference (NC) delegation meets former J&K CM Farooq Abdullah at his residence in Srinagar pic.twitter.com/Ez0AeacT7T
— ANI (@ANI) October 6, 2019
या शिष्टमंडळात पक्षाचे अनेक माजी आमदार आहेत. या शिष्टमंडळाने राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली होती. त्यांनी अब्दुल्ला यांना भेटण्याची परवानगी मागितली होती. राज्यपालांनी त्यांना परवानगी दिली होती.