पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीरमध्ये सुरक्षादलाचे जवान तपास करताना.

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षादलांच्या जवानामध्ये बुधवारी पहाटे चकमक उडाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर केलेल्या कारवाईमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश मिळाले.

कोरोनामुळे HSBC करणार ३५००० कर्मचाऱ्यांची कपात

त्रालमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. जवान तिथे आल्यावर दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये तीन दहशतवादी जागीच मारले गेले. या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. या चकमकीत कोणीही जवान जखमी झाल्याची माहिती नाही.

'२६/११ चा हल्ला हा 'हिंदू दहशतवादी' दाखवण्याचा कट शिजला होता'

राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यावेळी त्रालमधील बाहेर जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. गावात जवान दाखल झाल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. त्याला जवानांकडून लगेचच प्रतिसाद देण्यात आला. या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपले आहेत का, याचा शोध घेण्यात येत आहे.