पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जामिया हिंसाचार: ७० संशयितांचे फोटो जारी करत पोलिसांनी ठेवले बक्षीस

जामिया हिंसाचार

जामिया नगरमध्ये १५ डिसेंबर २०१९ रोजी नागरिकत्व सुधारणा कायद्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान हिंसाचार झाला होता. दिल्ली पोलिसांनी जामिया हिंसाचार प्रकरणी ७० संशयितांची छायाचित्र प्रसिध्द केली आहेत. ही छायाचित्रे सीसीटीव्ही फुटेजमधून काढण्यात आली आहेत. ज्यामध्ये हे सर्वजण हिंसा करताना दिसले आहेत. 

मनसेच्या ९ फेब्रुवारीच्या मोर्चाचा मार्ग ठरला

आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारामध्ये हे सर्व जण अत्यंत सक्रियपणे सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच, दिल्ली पोलिसांनी सामान्य लोकांना त्यांची ओळख पटवण्यास सांगितले आहे. या सर्वांना शोधण्यासाठी पोलिसांनी बक्षीस देखील ठेवले आहे. या हिंसाचारात जवळपास ५ बसेस जाळल्या आणि १०० पेक्षा जास्त खासगी आणि सार्वजनिक वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. १५ डिसेंबर २०१९ रोजी करण्यात आलेल्या आंदोलनात जामियाच्या विद्यार्थ्यांसह १०० हून अधिक जण सहभागी झाले होते.

प्रशांत किशोर आणि पवन वर्मांची जदयूमधून हकालपट्टी

आंदोलना दरम्यान संतप्त आंदोलकांनी दगड, काचेच्या बाटल्या आणि ट्युबलाईट फेकल्या होत्या. यामध्ये विद्यार्थी आणि पोलिसांसह ३० जण जखमी झाले होते. या प्रकरणात एकूण १०२ जणांना एसआयटीने अटक केली होती. शुक्रवारी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान, जामियाचे विद्यार्थी चंदन कुमार आणि प्रादेशिक राजकारणी आशु खान यांची याप्रकरणी तब्बल ७ तास चौकशी करण्यात आली होती.

डीएसकेच्या अलिशान गाड्यांचा लिलाव १५ फेब्रुवारीला होणार