नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी कुलगुरु नजमा अख्तर यांनी मोठे विधान केले आहे. नजमा अख्तर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत सर्व अफवांचे खंडन केले आहे. 'पोलिसांच्या कारवाईमध्ये आमच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला नाही, असे त्यांनी सांगितले. तसंच, जवळपास २०० जण जखमी झाले होते. त्यामध्ये बरेच विद्यार्थी आमचे असल्याचे नजमा अख्तर यांनी सांगितले.
Vice Chancellor of Jamia Millia Islamia, Najma Akhtar: There has been a strong rumour that two students died, we deny this totally, none of our students died. About 200 people were injured of which many were our students pic.twitter.com/3uGAAVJuri
— ANI (@ANI) December 16, 2019
सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली: फडणवीस
जामिया विद्यापीठात पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादासंदर्भात नजमा अख्तर यांनी सांगितले की, हिंसाचारा दरम्यान विद्यापीठाच्या संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. विद्यापीठ परिसरातील पोलिसांची उपस्थिती आम्ही सहन करू शकत नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना घाबरवले आहे. पुढे त्यांनी असे सांगितले की, परवानगी न घेता पोलिस आमच्या कॅम्पसमध्ये आले होते. त्यावेळी विद्यार्थी वर्गात अभ्यास करत होते.
आर्थिक मंदीमुळे मनुष्यबळात कपातीचा विचार नाही - टाटा मोटर्स
कुलगुरु नजमा अख्तर यांनी पोलिसांच्या कारवाईसंदर्भात पुढे असे सांगितले की, पोलिसांविरोधात तक्रार दाखल करणार आहे. तसंच जामिया मिलिया इस्लामिया मानव संसाधन विकास मंत्री यांच्यासमोर तथ्य मांडतील. रविवारी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या २०० विद्यार्थ्यांची यादी आमच्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
आधी हिंसा थांबवा, आंदोलक विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाने सुनावले