पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला अटक, पाकिस्तानी माध्यमांचा दावा

हाफिज सईद

जमाद उद दवाचा म्होरक्या आणि मुंबईतील २००८ मधील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला बुधवारी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली. पाकिस्तानमधील माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. लाहोरमध्ये त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

हाफिज सईदविरोधात भारताने अनेक पुरावे पाकिस्तानला दिले होते. पण त्याच्याविरोधात पाकिस्तान सरकारने कोणतीही कडक कारवाई केली नव्हती. आता त्याला अटक करण्यात आल्याने भारताच्या दाव्याला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. 

२००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे हाफिज सईदच होता. त्याचबरोबर २००६ मध्ये मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधारही तोच होता.