पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परराष्ट्र मंत्रालय CEO प्रमाणे चालविण्याचे जयशंकर यांचे संकेत, मोठे बदल

एस जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या कार्यपद्धतीची चर्चा सध्या दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये रंगू लागली आहे. अनेक परंपरागत चालत आलेल्या गोष्टींना त्यांनी परराष्ट्र मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यापासून बाजूला ठेवले आहे. एखादा यशस्वी व्यवसाय जितक्या कुशल पद्धतीने चालवला जातो, त्याच पद्धतीने आपल्या मंत्रालयाचे कामकाज चालावे, अशी त्यांची अपेक्षा असल्याचे दिसून येते. यासाठी त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 

परराष्ट्र मंत्रालयातील अत्यंत जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयशंकर यांनी परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अन्य चार सचिवांना साऊथ ब्लॉकमध्ये थांबून काम पाहण्याचे आदेश दिले आहेत. परदेश दौऱ्यांवेळी त्यांच्यासोबत जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या सहसचिवांनाही मंत्र्यांसोबत जाण्याऐवजी इतर ठिकाणी आवश्यक ते काम करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या संदर्भात साऊथ ब्लॉकमधील कोणत्याही अधिकाऱ्याने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. 

डॉ. वीरेंद्र कुमार १७ व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तारो कानो ज्या पद्धतीने आपल्या खात्याचे कामकाज चालवितात. त्याच धर्तीवर काम करण्याचे जयशंकर यांनी ठरविले आहे. पॉम्पिओ आणि कानो हे दोघेही परदेश दौऱ्यांवर असताना केवळ संबंधित अधिकाऱ्यांनाच सोबत घेतात. शिष्टाचार म्हणून कोणताही लवाजमा घेऊन जात नाहीत. 

एका माजी परराष्ट्र सचिवांनी याचे वर्णन करताना म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून जयशंकर यांना काम करायचे आहे. तर त्यांचा मंत्रालयातील परराष्ट्र सचिवांनी मुख्य कामकाज अधिकारी COO म्हणून काम करावे, अशी त्यांची इच्छा आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या १२ केंद्रीय अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

जयशंकर यांनी नुकतीच भूतानची राजधानी थिम्पूला भेट दिली. यावेळी ते एखाद्या सामान्य व्यक्तीसारखे प्रवासी विमानातून गेले. भारतीय हवाई दलाचे खास विमानाने जाणे त्यांनी टाळले. याच्यातूनही ते साध्या पद्धतीने आपले काम करू इच्छितात हेच स्पष्ट होते.