पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानशी नव्हे, टेररिस्तानशी चर्चेला अडचण - जयशंकर

एस जयशंकर

कश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानने स्वतःच्या देशात दहशतवाद्यांवर मोठी गुंतवणूक केली आहे. पण भारताने कलम ३७० रद्द केल्यामुळे ही सर्व गुंतवणूक वाया जाणार असल्याने पाकिस्तानचा तीळपापड होत असल्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेत सांगितले. त्याचबरोबर आम्हाला पाकिस्तानशी चर्चा करायला काहीच अडचण नाही. पण टेररिस्तानशी चर्चा करण्यात नक्कीच अडचण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जयशंकरही अमेरिकेला गेले आहेत. 

आम्ही सूडबुद्धीने वागणारे नाही, उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

ते म्हणाले, काश्मिरच्या मुद्द्यावर भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या देशात दहशतवाद्यांचे कारखानेच सुरू केले. पण आता त्याचा काहीच उपयोग होत नाही. पाकिस्तानने स्वतःहून याची कबुली दिली पाहिजे. दहशतवादाचा वापर करून आंतरराष्ट्रीय राजकारण करण्याचा प्रकार पाकिस्तानने टाळला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, याकडेही जयशंकर यांनी लक्ष वेधले.

येत्या शुक्रवारी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार - शरद पवार

भारताने जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले आहे. जर यामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाची भारताला साथ मिळाली, तर आपली ७० वर्षांतील दहशतवादावरील गुंतवणूक वाया जाईल, हे लक्षात आल्याने पाकिस्तान सैरभैर झाला. त्यामुळे एकीकडे ते चिडलेलेही आहे आणि दुसरीकडे त्यांना नैराश्यही आले आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.