पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये उद्ध्वस्त झालेले 'जैश'चे दहशतवादी कॅम्प पुन्हा सुरु

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये नेस्तनाबूत झालेले 'जैश'चे दहशतवादी कॅम्प पुन्हा सुरु (ANI)

पाकिस्तानमधील ज्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी स्थळं भारतीय हवाईदलाने उद्ध्वस्त केली होती, तिथे पुन्हा एकदा हालचाली सुरु झाल्याचे वृत्त आहे. जैश ए मोहम्मदने बालाकोट येथील आपले दहशतवादी ठिकाणे पुन्हा सुरु केली आहेत. सात महिन्यांपूर्वी भारतीय हवाईदलाने एअर स्ट्राइक करत ही ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. या ठिकाणांवर ४० जिहादींना जम्मू-काश्मीर आणि इतर ठिकाणी हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे चिडलेला पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी जैशची मदत घेत आहे. पाकिस्तानच्या कृपेमुळे जैशने आपले उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय केले आहेत. तिथे ४० जणांना प्रशिक्षण दिले जात आहे.

वीज चमकल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला धक्का, कर्मचारी जखमी

पाकिस्तानने ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या निर्णयानंतर दहशतवादी संघटनांना सूट दिली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीपूर्वी पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. हल्ले करुन काश्मीरप्रकरणी ते पुन्हा एकदा जगाचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करु इच्छितात. दरम्यान, संयुक्त राष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करणार आहेत.

जम्मू-काश्मीरबाबत भारत सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांची बैठकही झाली आहे. गोपनीय माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद फक्त जम्मू-काश्मीरच नव्हे तर गुजरात आणि महाराष्ट्रातही हल्ला करु शकते. आंतरराष्ट्रीय जाचापासून बचावण्यासाठी ते नवीन नावाचा आश्रय ही घेऊ शकतात. पाकिस्तान स्थित दहशतवादी समूहांना मुळ काश्मिरी दहशतवाद्यांचा उपयोग करण्यास सांगितले आहे. या संदर्भात मुश्ताक जरगर उर्फ लटरमच्या नेतृत्वाखाली अल उमरार मुजाहिदीनसारख्या निष्क्रिय समूहांनाही पुनर्जिवीत केले जात आहे.

लिव-इनपेक्षा विवाहित महिला अधिक आनंदीः RSS

भारतीय हवाईदलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पहिल्यांदा जिहाद प्रशिक्षणासाठी बालाकोटच्या ठिकाणांबरोबर मनशेर, गुलपूर आणि कोटलीच्या दहशतवादी शिबिरांमध्ये दहशतवादी समूहाद्वारा 'रिफ्रेशर' कोर्स सुरु करण्यात आले आहे. भारतीय सुरक्षा संस्थांनी बालाकोट ठिकाणांवरी प्रशिक्षण केंद्र पुन्हा एकदा सुरु झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. याची माहिती सरकारी उच्चस्तरावर देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या या फोटोसाठी लोक दहा लाख द्यायला तयार!