पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जैश-ए-मोहम्मदने दिली रेल्वे स्टेशन आणि मंदिर उडवण्याची धमकी

दहशतवादी

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतला. तेव्हापासून भारताच्या या निर्णायाचे पाकिस्तान तसंच दहशतवादी संघटना वारंवार विरोधक दर्शवत आहे. दरम्यान, पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा भारताला हल्ला करण्याची धमकी दिली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने एका पत्राच्या माध्यमातून भारताला धमकी दिली आहे. मुंबई, चेन्नई, बंगळुरुसह देशातील अनेक रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. जैशने रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त मंदिरामध्ये देखील बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

'छत्रपतींनी मागण्या करायच्या नसतात, आदेश द्यायचे असतात'

हरयाणातील रोहतक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'हिंदीमध्ये लिहिलेल्या या पत्राला पोस्टाच्या सहाय्याने रोहतक रेल्वे पोलिसांना पाठवण्यात आले होते. जे पत्र या दहशतवादी संघटनेने पाठवले आहे त्यावर मसूद अजहर याची स्वाक्षरी आहे. हे पत्र रोहतक पोलिसांना १४ सप्टेंबर म्हणजे शनिवारी मिळाले', असल्याचे सांगत पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच, मसूद अजहर हा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. 

तुकड्यांवर जगणारी आमची औलाद नाहीः शिवेंद्रराजे

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, या पत्रामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने ८ ऑक्टोबर रोजी देशातील वेगवेगळ्या भागातील रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली. हा हल्ला करुन दहशतवाद्यांच्या हत्येचा बदला घेतला जाईल. या रेल्वे स्थानकांमध्ये मुंबई, चेन्नई, बंगळुरु, राजस्थान आणि हरयाणातील रोहतक, रेवाडी आणि हिसार यांचा समावेश आहे. हे पत्र मिळाल्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु केला असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पळपुट्यांचा लोक समाचार घेतीलः शरद पवार

दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी १२ सप्टेंबरला कठुआ येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांकडून ४ एके-५६, २ एके-४७, ६ मॅगझिन, १८० जिवंत काडतूस आणि ११ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. तर १० सप्टेंबरला जैशच्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. 

शेतकरी आत्महत्याप्रकरणी ओमराजेंवर गुन्हा