पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत येत असलेल्या 'जैश'च्या दहशतवाद्याला हरियाणातून अटक

दहशतवादी (प्रतिकात्मक छायाचित्र)

दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या एका संशयित दहशतवाद्याला अंबाला छावणी परिसरातून अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनीच ही माहिती माध्यमांना दिली. 

अंबालाचे पोलिस अधीक्षक अभिषेक जोरवाल यांनी सांगितले की, संशयित दहशतवाद्याची ओळख पटली असून तो जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे. मोहम्मद इस्माईल असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी सांयकाळी जम्मू-काश्मीर लष्कर गुप्तचर विभाग आणि पंजाब पोलिसांकडून जैशचा एक संशयित दहशतवादी सफरचंद घेऊन जात असलेल्या एका ट्रकमधून अंबाला येथून जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

गुलालाई! पाकविरोधात मानवाधिकाराच्या लढ्यातील नवा चेहरा

ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अंबाला-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर एक तपासणी नाका उभा केला आणि दहशतवाद्याचा तपास सुरु केला. पोलिसांनी संशयिती ट्रकला थांबवले. त्यावेळी त्यांना ट्रकमध्ये एक व्यक्ती दिसला. त्याला आपली ओळख सांगता आली नाही. पोलिसांना त्याचा संशय आला.

त्याला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. अंबाला पोलिसांनी याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला आणि पंजाब पोलिसांना दिली. त्यानंतर त्याला जम्मू पोलिसांकडे सोपवण्यात आले.

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, त्यांनी जम्मूमध्ये आपल्या समकक्षांशी संपर्क केला. पण दहशतवाद्याबाबत अचूक माहिती समजू शकलेली नाही. पंजाब पोलिस आणि लष्कराचे गुप्तचर विभाग पंजाब हद्दीपासून या ट्रकचा पाठलाग करत होते.

विमानात बिघाड, पाकला जाणारे इम्रान खान यांचे विमान पुन्हा न्यूयॉर्कमध्ये