पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोठ्या हल्ल्याची 'जैश'ची तयारी, गुप्तचर यंत्रणांनी केले सावध

मोठ्या हल्ल्याची 'जैश'ची तयारी, गुप्तचर यंत्रणांनी केले सावध

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्भूमीवर १० दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारला पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद हालचालींबाबत सतर्क करण्यात आले आहे. आता अनेक सुरक्षा संस्थांनी सरकारला दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचे सांगत सावध केले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी संघटनांमधील संदेशाची उकल केल्याचे सांगण्यात येते.

CJI रंजन गोगोईंनी निकालानंतर न्यायाधीशांना नेले 'डिनर'ला

यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनेक सुरक्षा संस्था ज्यामध्ये लष्कर, रॉ आणि आयबीचाही समावेश आहे. त्यांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. 

त्या अधिकाऱ्याने म्हटले की, अखेरच्या १० दिवसांमध्ये हल्ल्याच्या शक्यतेशी निगडीत माहिती सातत्याने येत होती. अशातच अयोध्याप्रकरणी कधीही निकाल येऊ शकतो हे निश्चित झाले. नाव न सांगण्याच्या अटीवर आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, या मोहिमेत सर्वांत खास वैशिष्ट्य हे होते की, बहुतांश चर्चा ही 'डार्क वेब'च्या माध्यमातून करण्यात आली. जी इनक्रिप्टेड आणि कोडमध्ये होती. सुरक्षा संस्थांना त्याचा उलगडा करण्यासाठी मोठे कष्ट करावे लागले.

अयोध्याः निकालावेळी वारंवार झाला पुरातत्व विभागाच्या अहवालाचा उल्लेख