पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जैश ए मोहम्मदच्या नावात बदल, नव्या रुपात दहशतवादी कारवायांची तयारी

मसूद अजहर

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने आपल्या नावात बदल केला आहे. आता ही संघटना मजलिस वुरासा ए शुहूदा जम्मू वा काश्मीर या नावाने दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानमधील जिहादी प्रशिक्षण तळ बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्या देशावर दबाव टाकला जातो आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि दहशतवादी कारवाया सुरूच ठेवण्यासाठी संघटनेने आपल्या नावात बदल केला आहे. या संघटनेचा म्होरक्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहर सध्या आजारपणामुळे अंथरुणाला खिळला असल्याची माहितीही मिळाली आहे. त्यामुळे त्याचा मुलगा मुफ्ती अब्दुल रौफ असघर हाच सध्या ही संघटना चालवत आहे.

इम्रान खान यांचा कबुलनामा: अल कायदाला पाकिस्तानात दिले प्रशिक्षण

पाकिस्तानमधील भावलपूर येथे सध्या मसूद अजहर याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे तो संघटनेच्या कारवायांमध्ये सक्रिय नाही. भारतातील दहशतवादविरोधी तपास संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशने केवळ आपल्या नावात बदल केला आहे. पण त्यांच्या कारवाया, त्यांचे नेतृत्त्व यामध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. संघटनेचा एका नेता मौलाना आबिद मुख्तार याने यापूर्वीच भारत, अमेरिका आणि इस्रायलविरोधात जिहाद पुकारला आहे. काश्मीरमध्ये झालेल्या सभांमध्ये त्याने आक्रमकपणे भारताविरोधात कारवाईसाठी सज्ज राहण्यास सांगितले होते.

बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप मागे

अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, जैश ए मोहम्मदने आत्मघातकी हल्ला करणाऱ्या ३० जणांचा एक गट तयार केला आहे. भारतातील जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळांवर हल्ले करण्यासाठी हा गट तयार करण्यात आला आहे. मुफ्ती अब्दुल रौफ असघर यानेच बालाकोटमधील दहशतवादी प्रशिक्षण तळ पुन्हा सक्रिय केले आहेत. त्यासोबतच जास्तीत जास्त तरुणांनी जिहादी कारवायांमध्ये सहभागी व्हावे आणि त्यासाठी भावलपूर आणि सियालकोटमध्ये प्रशिक्षण घ्यावे, यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.