पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीला हादरवण्यासाठी जैशने 'या' संघटनांशी केली हात मिळवणी

दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. अशातच दहशतवादी राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याच्या विचारात आहेत. दिल्लीत हल्ला करण्यासाठी जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी घुसले आहेत. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला करण्यासाठी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने लष्कर-ए-तोएबा आणि हरकत-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांशी हात मिळवणी केली आहे. 

आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार

या योजनेला यशस्वी करण्यासाठी लष्कर-ए-तोएबा आणि हरकत-उल-मुजाहिद्दीनचे स्लीपर सेल जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी मिळून काम करत आहे. याचे नेतृत्व जैशचे कमांडर अबू उस्मान करत आहे. गेल्या आठवड्यात त्यानेच बांदीपुरा भागातील मीर मोहल्ला येथील सफरचंदाच्या बागेत झालेल्या बैठकीत काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांना आदेश दिले होते.

नाशिक जिल्ह्यात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू

दरम्यान, या बैठकीची माहिती गुप्तचर संघटनांनी दिल्ली पोलिस आणि अन्य सुरक्षा एजन्सींना दिली होती. या बैठकीत दहशतवादी अबू उस्मान याने दहशतवाद्यांना सांगितले की, काश्मीरमधील लोकांना लवकरच एक चांगली बातमी ऐकू येईल. ही आनंदाची बातमी जम्मू आणि दिल्लीमध्ये मोठ्या स्फोटांसह  येईल. तेव्हापासून दिल्ली-एनसीआरमधील स्पेशल सेल संशयितांवर छापा टाकत आहे. त्याचबरोबर, दिल्लीमध्ये हाय अलर्ट देत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. 

तिकीट कापलेल्या बावनकुळेंना भाजपने असा दिला 'न्याय'