पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकचा कुटील डाव; मसूद अझहरला गुप्तपणे कारागृहातून सोडलं

मौलाना मसूद अझहर (AFP file photo)

पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतविरोधी कुरापती काढण्यास सुरुवात केल्याचे दिसते. आयबीने राजस्थानजवळ भारत-पाकिस्तान सीमेवर अतिरिक्त पाकिस्तानी सैनिकांच्या तैनातीबाबत सरकारला सावध केले आहे. त्याचबरोबर इस्लामाबादहून एका मोठ्या कारवाईची तयारी सुरु असल्याचा इशाराही दिला आहे. पाकिस्तानने दोन वाँटेड अतिरेक्यांना दहशतवादी कृत्य करण्यासाठी मुक्तही केल्याचे आयबीने सांगितले आहे. ही माहिती 'हिंदुस्थान टाइम्स'ला संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला मुक्त केले असून तो मोठा दहशतवादी कट रचत आहे.

सरकार कलम ३७१ कधीच हटवणार नाही : शहा

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान येत्या काही दिवसांत सियालकोट-जम्मू आणि राजस्थान सेक्टरमध्ये 'मोठी कारवाई' करण्याची योजना आखत आहे. त्याचबरोबर या योजने अंतर्गतच पाकिस्तानने राजस्थान सीमेवर अतिरिक्त सैनिकांना तैनात करण्यास सुरुवात केली आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला मुक्त केले असून तो मोठा दहशतवादी कट रचत आहे.

१०० दिवसांच्या कार्यकाळाबद्दल अभिनंदन! राहुल गांधींचा सरकारला टोमणा

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या इनपुटची जम्मू आणि राजस्थान सेक्टरमध्ये संबंधित सीमा सुरक्षा दल आणि लष्कराला माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या कोणत्याही अचानक होणाऱ्या हालचालींपासून सावध राहण्यास सांगितले आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या निर्णयावरुन धमकी दिली आहे. जागतिक समुदाय कोणत्याही विनाशकारी कृत्यास जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

जेटमलानींनी वयाच्या १३ व्या वर्षी मॅट्रिक तर १७ व्या वर्षीच घेतली LL.Bची पदवी

दोन्ही देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकने गुप्तरित्या जैश ए मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरला दहशतवादी ऑपरेशनच्या योजनेसाठी मुक्त केल्याचे आयबीने म्हटले आहे. तर इतर दहशतवादी संघटना खुलेपणाने काम करत आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या सीआरपीएफ हल्ल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी मसूद अझहरला ताब्यात घेतल्याचे वृत्त होते.