पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

UAPA: मसूद अजहर, हाफिज सईद व दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित, भारत सरकारची कारवाई

UAPA: मसूद अजहर, हाफिज सईद व दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित, भारत सरकारची कारवाई

दहशतवाद्यांना लगाम लावण्यासाठी करण्यात आलेला नवा कायदा यूएपीए अंतर्गत भारताने ४ कुख्यात दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. यात पहिल्या क्रमांकावर पुलवामा हल्ल्याचा मास्टरमांईड मसूद अझहरला ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर दहशतवादी संघटना जमात उद दावाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर माफिया डॉन दाऊद इब्राहिम आहे. 

दहशतवादी जकी उर रहमान लख्वीचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. यूएपीए (बेकायदा कृत्य प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक २०१९) कायदा नुकताच संमत करण्यात आला होता. दरम्यान, संयुक्त राष्ट्राकडूनही मसूद अझहर आणि हाफिज सईदला जागतिक दहशतवादी जाहीर केले गेले आहे. 

काश्मिरात दोन जिवंत दहशतवाद्यांना लष्कराने पकडले

दहशतवादाच्या विरोधात १९६७ साली यूएपीए हा कायदा करण्यात आला होता. या कायद्यात एखादी संस्था व संघटनेला दहशतवादी घोषित करण्याची तरतूद होती. कुठल्याही व्यक्तीला दहशतवादी घोषित करता येत नव्हते. दहशतवादाला चिथावणी देणारे त्याचा फायदा उचलत होते. त्यांना चाप लावण्यासाठी सरकारने या कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मांडले. एका व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याची तरतूद दुरुस्ती या विधेयकात करण्यात आली.

पाकच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याचे पॉर्नस्टारने उघडले डोळे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jaish chief Masood Azhar Lashkars Hafiz Saeed and Dawood Ibrahim designated as terrorists under anti terror law