दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोएबाचे प्रशिक्षण शिबीर पाकिस्तानमधून अफगाणिस्तानमधील कुनार, नंगरहार, नुरिस्तान आणि कंदहारला स्थलांतरित झाल्याची गोपनीय माहिती भारताला मिळाली आहे. काबूल आणि कंदहारमधील भारताच्या राजनैतिक कार्यालयाकडून ही माहिती समोर आली आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय हवाईदलाने बालाकोट येथील दहशतवादी शिबिरांवर केलेल्या एअरस्ट्राइकनंतर दहशतवादी संघटना अफगाणिस्तानमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत.
पुलवामा हल्ल्यासाठी RDX, अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याचे स्पष्ट
पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैशच्या दहशतवादी शिबिरावर हल्ला केला होता.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला लवकरच अटक
'हिंदुस्थान टाइम्स'ला मिळालेल्या दस्ताऐवजानुसार, पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांनी अफगाण तालिबान, अफगाण बंडखोर समूह, हक्कानी नेटवर्कबरोबर हात मिळवला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील ड्युरंड रेषेवर दहशतवादी संघटना आपल्या कट्टर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. कदाचित त्यामुळेच मोदी सरकारने इमरान खान सरकारला १-२ जुलैला १५ हून अधिक जैशचे नेते आणि दहशतवादी फंडिंगशी निगडीत पाच चॅरिटी संस्थांवर कारवाई करण्याची सूचना केली होती. भारताने पाकला या दहशतवादी संघटनांवर कारवाईचा दिखावा न करण्याचे स्पष्ट केले आहे.
बालाकोट हल्ल्यांच्या नियोजनकाराला मोदींकडून बढती, 'रॉ'चे प्रमुखपद
भारतीय सुरक्षा संस्थांच्या मते, दहशतवादी संघटना ड्युरंड सीमा रेषा पार करण्याचे सर्वांत मोठे कारण हे पाकिस्तानला काळ्या यादीत जाण्यापासून रोखण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आर्थिक विषयांशी निगडीत जागतिक संघटनेची बैठक लवकरच पॅरिसमध्ये होणार आहे. त्यांच्या काळ्या यादीत समावेश होऊ नये म्हणून ही पावले उचलली जात असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान सध्या 'ग्रे' यादीत आहे.