पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे पी नड्डा यांची बिनविरोध निवड

जे पी नड्डा

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सोमवारी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जे पी नड्डा आता मावळते अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पदभार स्वीकारतील. जे पी नड्डा यांची निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती. सोमवारी सकाळी त्यांनी या पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्याविरोधात कोणीच उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जे पी नड्डा जून २०१९ पासून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राधामोहन सिंह यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.

देश आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेनेः प्रकाश आंबेडकर

विद्यार्थी चळवळींपासून जे पी नड्डा हे भाजपमध्ये कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगले संबंध आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे त्यांची निवड या पदासाठी निश्चित करण्यात आली होती.  

पंतप्रधान मोदींचे विद्यार्थ्यांना पाच मोलाचे कानमंत्र

भाजपमध्ये एका व्यक्तीकडे एकच पद असते. तरीही २०१९ मधील लोकसभा निवडणूक झाल्यावर अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ही दोन्ही पदे होती. त्यावेळी नड्डा यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तेव्हापासून पुढील अध्यक्ष कोण होणार याची चर्चा भाजपच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर जे पी नड्डा यांच्या निवडीमुळे त्याला पूर्णविराम मिळाला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jagat Prakash Nadda elected unopposed as the National President of Bharatiya Janata Party