पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेपी नड्डा BJP चे कार्यकारी अध्यक्ष, अध्यक्षपदी शहा कायम

जेपी नड्डा

मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात केंद्रीय आरोग्य मंत्री पद भुषवलेल्या जेपी नड्डा यांच्याकडे भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोदी सरकारच्या पहिल्या काळातही ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र त्यावेळी सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागली होती.  

सोमवारी भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. दरम्यान आगामी सहा महिने भाजपच्या अध्यक्षपदी अमित शहा कायम राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नड्डा पक्षाचे काम पाहतील. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडणारे ५८ वर्षीय जेपी नड्डा हे हिमाचल प्रदेशचे असून शहा यांच्याप्रमाणेच त्यांनाही भाजपचे रणनितीकार म्हणून ओळखले जाते.

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जेपी नड्डा यांची निवड झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये भाजपने चांगले यश मिळवले आहे. पंरतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर अमित शहा यांनी स्वत: अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या कोणाला तरी द्यावे, असे म्हटले होते.