पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मिरचे माजी सनदी अधिकारी शाह फैजल यांच्यावर मोठी कारवाई

शाह फैजल

जम्मू-काश्मीरमधील माजी सनदी अधिकारी आणि जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंटचे शाह फैजल यांच्या विरोधात तेथील प्रशासनाने कारवाई केली आहे. शाह फैजल यांच्याविरोधात सार्वजनिक सुरक्षितता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यानंतर ही आणखी एक मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे. 

राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप, काँग्रेसचा फायदा आणि तोटाही

शाह फैजल हे जम्मू-काश्मीरमधील भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत पहिले आले होते. तेव्हापासून ते चर्चेत आहेत. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सध्या ते श्रीनगरमध्ये अटकेत आहेत. 

अमेरिकेने सुलेमानीला ज्या ड्रोन तंत्रज्ञानाने मारले तेच भारताला हवंय

सार्वजनिक सुरक्षा कायद्यानुसार प्रशासन कोणत्याही खटल्याशिवाय संबंधित व्यक्तीला सहा महिन्यांपर्यंत अटकेत ठेवण्याला परवानगी देते. ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केले. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकारने जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती, अली मोहम्मद सागर यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.