पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इटलीतून आलेल्यांमुळेच भारतात कोरोनाचा मोठा फैलाव

कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असल्यामुळे लोक मास्क लावून काळजी घेत आहेत. (संग्रहित छायाचित्र)

भारतात कोरोना व्हायरसचा फैलाव करण्यास कोणता देश कारणीभूत असेल तर तो इटली आहे. कारण भारतात आढळलेल्या ४५ कोरोनाबाधितांपैकी ३५ जण हे इटलीतून परतलेले आहेत. इटलीतून आल्यानंतरच त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. यापैकी काही जण हे इटलीचे नागरिक आहेत. तर काही जण फिरण्यासाठी इटलीला गेले होते.

कोरोनामुळे इराणमध्ये अडकलेले ५८ नागरिक भारतात परतले

चीन आणि दक्षिण कोरियानंतर इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा वेगाने फैलाव झाल्याचे दिसून आले. इटलीमध्ये ७३७५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासात आढळले. यापैकी ३६६ जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. चीननंतर इटलीमध्येच कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक रुग्ण मृत पावले आहेत. 

इटलीमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याचे लक्षात आल्यावर तेथील सुमारे एक कोटी ६० लाख लोकांना त्यांच्या घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर ३ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 

ईशान्य भारतातील तरुणीला दिल्लीत कोरोना व्हायरस म्हणून हिणवले

भारतातील काही रुग्ण आपल्याला जाणवणारी लक्षणे डॉक्टरांना सांगण्यास किंवा आपण गेल्या काही दिवसांमध्ये कुठे परदेशात फिरून आलो आहोत का, हे सांगण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले आहे. काही रुग्ण तर रुग्णालयातून पळून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. केरळमधील एक दाम्पत्य आणि त्यांच्या २४ वर्षांच्या मुलाला कोरोना झाल्याचे आढळून आले. पण त्यांनी आपण इटलीतून आलो होतो हे सांगितले नाही. त्याचबरोबर आपल्याला होत असलेला त्रासही लवकर डॉक्टरांना सांगितला नाही, असेही दिसून आले.