पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

COVID 19 : इटलीत २४ तासांत विक्रमी मृत्यूतांडव!

कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या इटलीमध्ये मृत्यूचं अक्षरश: तांडव सुरु आहे. शुक्रवारी एका दिवसांत मृतांचा आकडा जवळपास हजाराला टेकला. एएफपीच्या वृत्तानुसार, इटलीत मागील २४ तासांत कोरोना विषाणूने तब्बल ९६९ जणांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत एका दिवसातील हा मृतांचा सर्वाधिक आकडा आहे. यापूर्वी इटलीत २१ मार्चला सर्वाधिक ७९३ लोकांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. कोरोना विषाणूची लागण झालेला आकड्या  ८ ० हजार पेक्षा अधिक असून यातील  ८ हजारहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. 

भारतात कोरोनाचा विळखा, रुग्णांचा आकडा ७४८ वर तर १९ जणांचा मृत्यू

चीनमधील वुव्हान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा इटलीला बसला आहे. Worldometer च्या २७  मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण हे सर्वाधिक आहेत.  दुसऱ्या क्रमांकावर चीन असून इटली हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण मृतांच्या आकड्यामध्ये इटलीमधील आकडेवारी ही भयावह आहे.  देशांपेक्षा इटलीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी असला तरी मृतांचा आकडा हा सर्वाधिक आहे.  
चीनमध्ये जवळपास ३ हजारपेक्षा अधिक तर अमेरिकेत हजारीच्या घरात कोरोना विषाणूने लोकांचा जीव घेतला आहे. इटलीचा आकडा या दोन्ही राष्ट्रांपेक्षा कित्येक पटीने अधिक असून हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.

कोरोना: तुटपुंज्या मदतीवरुन धोनीला ट्रोल करणाऱ्यांवर साक्षी भडकली

कोरोना विषाणू भारतासाठीही डोकेदुखी ठरत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत असून तो हजारीच्या दिशेने चालला आहे. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तीन आठवडे नागरिकांनी सहकार्य केल्यास आपण या संकटावर मात करु शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूचे गांभिर्य लक्षात घेऊन भारत सरकार कठोर पावले उचलताना दिसत आहे.