पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना झालेले इटलीतील दाम्पत्य राजस्थानात ६ जिल्ह्यांत फिरल्याची माहिती

इटलीतील एका दाम्पत्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (संग्रहित छायाचित्र)

इटलीतून भारतात आलेल्या एका दाम्पत्याला कोरोना झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. या दाम्पत्यातील ६९ वर्षीय पतीला कोरोनाची लागण झाल्याचे पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांच्या पत्नीलाही कोरोना असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे दाम्पत्य भारतात आल्यानंतर राजस्थानातील सहा जिल्ह्यांमध्ये फिरले असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपने ८ आमदारांना बळजबरीने हॉटेलवर ठेवले, काँग्रेसचा आरोप

इटलीतून २१ सदस्यांचा एक गट २१ फेब्रुवारीला भारतात आला. या सगळ्यांनी राजस्थानातील सहा जिल्ह्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत भेट दिली. आता या गटातील इतर सर्वजण आग्रामध्ये आहेत. राजस्थानमधील सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारीला हा गट राजस्थानमधील झुनझुन जिल्ह्यातील मंडावामध्ये पोहोचला. तिथे एका स्थानिक हॉटेलमध्ये हे सर्वजण उतरले होते. २२ फेब्रुवारीला ते सर्वजण बिकानेरला गेले. तिथून जैसलमेरला गेले. २३ आणि २४ फेब्रुवारीला ते जैसलमेरलाच राहिले. तिथून पुढे ते जोधपूरला गेले. २६ फेब्रुवारीला ते उदयपूरला पोहोचले. तिथे ते दोन दिवस राहिले होते. २८ फेब्रुवारीला ते सर्व जयपूरला आले होते. 

बंगालमध्ये राहणारे सर्व बांगलादेशी भारतीय नागरिक: ममता बॅनर्जी

जयपूरला आल्यानंतर दाम्पत्यापैकी पतीला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना लगेचच जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजचे २९ फेब्रुवारीला त्यांना सरकारी रुग्णालयातील विशेष वॉर्डात हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर कोरोना आणि एन१एन१साठी चाचण्या घेण्यात आल्या. मंगळवारी या दाम्पत्यापैकी पतीला कोरोनाच झाल्याचे पुण्यातील एनआयव्हीने दिलेल्या चाचणी अहवालाच्या माध्यमातून स्पष्ट झाले.