पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहा त्यावेळी जे म्हणाले ते खरंच होतं, लोकसभा अध्यक्षांनी केले स्पष्ट

फारूख अब्दुल्ला

जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांना गेल्या काही दिवसांपासून ताब्यात ठेवण्यात येत असल्याचा मुद्दा सोमवारी लोकसभेत गाजला. काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी सोमवारी कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित केला आणि सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एकीकडे खासदारांना जम्मू-काश्मिरला जाण्यापासून रोखले जाते आहे तर दुसरीकडे युरोपियन युनियनच्या नेत्यांना सरकारच जम्मू-काश्मीरमध्ये घेऊन जाते आहे, यावरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादीकडून थोडं शिका, मोदींनी राज्यसभेत केलं कौतुक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनावेळी ऑगस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फारूख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले नसल्याचे लोकसभेत सांगितले होते. ते त्यांच्या मर्जीनुसार त्यांच्याच घरात आहेत, असे अमित शहा म्हणाले होते. तोच मुद्दा पकडून अधीररंजन चौधरी यांनी सोमवारी फारूख अब्दुल्ला अजून ताब्यात आहेत. त्यांच्यावर किती अन्याय केला जातो आहे, अशी टीका केली.  

अधीररंजन चौधरी यांनी हे वक्तव्य केले त्यावेळी अमित शहा सभागृहात नव्हते. त्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या विषयावरील माहिती स्पष्ट करण्यासाठी सांगितले की, अमित शहा यांनी ज्यावेळी हे निवेदन केले होते. त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यावेळी त्यांचे लोकसभेतील वक्तव्य योग्यच होते, असे ओम बिर्ला म्हणाले.

उदयनराजेंना पराभूत करणारे श्रीनिवास पाटील यांनी घेतली शपथ

फारुख अब्दुल्ला यांना नंतर सार्वजनिक सुरक्षितता कायद्याच्या आधारे ताब्यात घेण्यात आले, असे त्यांनी सांगितले. त्यांना सप्टेंबरमध्ये ताब्यात घेण्यात आले, असेही स्पष्ट करण्यात आले. 

ऑगस्टमध्ये कलम ३७० रद्द करीत जम्मू-काश्मिरचे विभाजन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख अस दोन नवे केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथील काही नेत्यांना सरकारने ताब्यात ठेवले होते. हाच मुद्दा सोमवारी लोकसभेत काँग्रेसकडून आक्रमकपणे मांडण्यात आला.