पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकची जनता कुमारस्वामी सरकारला वैतागली होती : येदियुरप्पा  

बीएस येदियुरप्पा

काँग्रेस-जेडीएसच्या अपयशानंतर कर्नाटकातील राजकीय नाटकाचा पहिला अंक संपला आहे. मंगळवारी रात्री  उशीराने सभागृहात पार पडलेल्या विश्वासदर्शक ठरावात ९९ विरुद्ध १०५ असा कौल मिळाल्यानंतर कुमारस्वामी सरकार पडल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेस-जेडीएसचा हा पराभव भाजपसाठी मोठा विजय मानला जात आहे. 

कर्नाटकच्या विधानसभेतील हा कौल लोकशाहीचा विजय असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष बीएस येदियुरप्पा यांनी म्हटले आहे. कर्नाटकची जनता कुमारस्वामी सरकारला कंटाळली होती. आता राज्यात विकासाचे दरवाजे उघडले जातील, असे आश्वासनही त्यांनी कर्नाटकच्या जनतेला दिले.

भाजप नेते जगदीश शेट्टर म्हणाले की, सभापतींनी अद्याप बंडखोर आमदारांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. राजीनामा स्वीकारल्यानंतर ते आमदार भाजपमध्ये येतील की नाही, हे स्पष्ट होईल. सध्याच्या घडीला भाजपकडे १०५ एवढे सर्वाधिक संख्याबळ आहे. यापरिस्थितीतही आम्ही स्थिर सरकार देऊ शकतो.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: It is victory of democracy People were fed up with Kumaraswamy government BS Yeddyurappa says after karnataka Floor test