पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ही तर वाढदिवसाची सर्वांत मोठी भेट, केजरीवालांच्या पत्नीनं व्यक्त केला आनंद

सुनीता केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपला टक्कर देत पुन्हा निर्विवाद यश मिळवले. या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांचा पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीत आपचा विजय ही मला मिळालेली वाढदिवसाची सर्वांत मोठी भेट आहे, असं म्हणत केजरीवाल यांची पत्नी सुनीता यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

'भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही'

सुनीता केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे, आजच्याच दिवशी निवडणुकीचाही निकाल होता. या निकालानं अपेक्षित यश पदरात पडल्यानं सुनीता यांनी आनंद व्यक्त केला आहे. 'मला मिळालेली ही वाढदिवसाची सर्वात मोठी भेट आहे. हा सत्याचा विजय आहे. मला वाटतं लोकांच्या समस्यांचा प्रश्न राजकारणात महत्त्वाचा आहे. चुकीची व्यक्तव्यं करून राजकारण करणं योग्य नाही, प्रत्येक पक्षानं हा धडा घेतला पाहिजे', असं सुनीता एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या. 

'केजरीवालांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो'

तर निकालानंतर अरविंद केजरीवालांनी दिल्लीकरांचे मनापासून आभार मानले. 'तुम्ही तिसऱ्यांदा आपल्या मुलावर विश्वास दाखवला. हा विजय दिल्लीतील प्रत्येक कुटुंबीयांचा विजय आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून दिल्लीकरांनी नव्या राजकारणाला जन्म दिला आहे. हे राजकारण देशासाठी एक उत्तम उदाहरण ठरेल', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

'भाजपच्या पराभवात आपला आनंद शोधणे काँग्रेसने बंद केले पाहिजे'