पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रम लँडर सापडला पण झुकलेल्या अवस्थेत...

चांद्रयान २

चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर असल्याचे दिसून आले असून, त्याची कसलीही मोडतोड झालेली नाही. विक्रम लँडर झुकलेल्या अवस्थेत एकत्रित स्वरुपात दिसून आला आहे, अशी माहिती इस्रोने दिली. पण त्याच्याशी अद्याप संपर्क प्रस्थापित झालेला नाही. विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विक्रम लँडरचे हार्ड लँडिंग झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भास्कर जाधवही शिवसेनेत, शुक्रवारी औपचारिक प्रवेश

चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क शनिवारी पहाटे तुटला होता. विक्रम लँडर चंद्रावतरण करण्याआधी काही मिनिटे त्याचा इस्रोच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला होता. त्यावेळी विक्रम लँडरचे नक्की काय झाले हे सुद्धा समजलेले नव्हते. मात्र, रविवारी विक्रम लँडरची थर्मल इमेज ऑर्बिटरने घेतली असल्याचे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले. त्याचबरोबर संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

ASHES 2019 : चौथ्या कसोटीतील विजयासह कांगारु ठरले भारी

चांद्रयान २ मोहिमेतील अपेक्षित उद्दिष्ट्य ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत गाठले गेले आहे. यामुळे चंद्राच्या अभ्यासाला मदत होणार आहे, असे इस्रोने स्पष्ट केले आहे.