पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इस्रोकडून लवकरच चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी पुन्हा प्रयत्न'

के शिवन

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेला शेवटच्या टप्प्यात अपयश आले असले तरी लवकरच पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी प्रयत्न केले जातील, असे इस्रोचे प्रमुख डॉ. के शिवन यांनी म्हटले आहे. याबद्दल अधिक माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. गेल्या सप्टेंबर महिन्यात चांद्रयान मोहिमेमध्ये विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होता. पण मोहिमेच्या अगदी अंतिम टप्प्यात विक्रम लँडरचा इस्रोच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला होता. 

सत्ता स्थापण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र येतीलः शरद पवार

दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पदवीप्रदान समारंभासाठी के शिवन दिल्लीमध्ये आले होते. या कार्यक्रमात त्यांनी चांद्रयान २ मोहिमेनंतरच्या घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले, चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी आमच्याकडे असलेले तंत्रज्ञान जगापुढे दाखवले गेले पाहिजे. त्यासाठी एक आराखडा आम्ही तयार करतो आहोत. पण या माध्यमातून पुन्हा मोहिम कशी आखायची हे अद्याप निश्चित झालेले नाही. लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

सरकारला पूर्वीच कळवलं होतं, हेरगिरी प्रकरणावर व्हॉट्सअ‍ॅपचं स्पष्टीकरण

चांद्रयान २ मोहिमेतील चंद्राभोवती फिरत असलेल्या ऑर्बिटरच्या माध्यमातून माहिती घेण्याचे काम सध्या इस्रोकडून सुरू आहे. २२ जुलै रोजी चांद्रयान २ मोहिमेतील प्रक्षेपकांना चंद्राच्या दिशेने उड्डाण केले होते. पण या मोहिमेतील विक्रम लँडरचा इस्रोच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटल्यामुळे ही मोहिम अंतिम टप्प्यात अपयशी ठरली.