पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इस्रोतील शास्त्रज्ञांची हैदरबादमध्ये हत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) हैदराबादमधील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये कार्यरत असलेले शास्त्रज्ञ एस सुरेश यांची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे. ते राहात असलेल्या घरामध्ये मंगळवारी त्यांचा मृतदेह आढळून आला. 

निवडणुकीत पैसे वाटणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, इन्कम टॅक्सची QRT स्थापन

हैदराबादमध्ये अमीरपेट भागात अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये सुरेश राहात होते. मूळचे केरळचे असलेले सुरेश सध्या एकटेच या सदनिकेत राहायचे. मंगळवारी ते कामावर न आल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. पण काहीच प्रतिसाद न आल्यामुळे सहकाऱ्यांनी त्यांच्या पत्नीला फोन केला. त्या चेन्नईमध्ये बँकेत कर्मचारी आहेत.

यानंतर सुरेश यांची पत्नी आणि त्यांचे नातेवाईक लगेचच हैदराबादला आले. त्यांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांच्या समक्ष त्यांच्या सदनिकेचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी सुरेश यांचा मृतदेह जमिनीवर पडल्याचे आढळून आले. सुरेश यांच्या डोक्यावर कोणीतरी जोरदार घाव घातल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यानंतर सुरेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. 

राज्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला असणार खास सुविधा

संबंधित अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.