पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांद्रयान 2 : मोहीम ९० ते ९५ टक्के यशस्वी : इस्रो

चांद्रयान २ मोहिम ९० ते ९५ टक्के यशस्वी

चांद्रयान २ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर उतरण्याच्या अखेरच्या क्षणाला विक्रम लँडर आणि इस्रो मुख्यालयाचा संपर्क तुटला. ऐतिहासिक उंबरठ्यावर शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक परिश्रम हतबल ठरले. या मोहिमेच्या कार्यात व्यस्त असलेल्या इस्त्रो कार्यालयातील प्रत्येक शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर हे साफ दिसत होते. शनिवारी मध्यरात्रीच्या घडामोडीनंतर ऐतिहासिक मोहिमेसंदर्भात इस्त्रोने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

चांद्रयान मोहीम कठीण होती, असे इस्रोने म्हटले आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या उच्च पातळीवर आमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण झेप होती, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.  भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून चांद्रयान मोहीम ९० ते ९५ टक्के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत आपले काम करत राहणार असल्याचे इस्रोने स्पष्ट करण्यात आले.  

विक्रम लँडर चंद्रावर उतरलेला असू शकतो, थोडा धीर धरा, इस्रोच्या माजी प्रमुखांचे मत

इस्रोने म्हटलंय की, ही मोहिम सर्वात कठीण होती.  आपल्या या मोहिमेकडे जगाचे लक्ष होते. ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत आहे. त्यामुळे आपल्याला चंद्रावरील छायाचित्रे मिळण्यास मदत होणार आहे. शनिवारी मध्यरात्री विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यापासून २.१ किमी अंतरावर असताना संपर्क तुटला होता. जवळपास एक दशकापासून चांद्रयान मोहिमेसंदर्भात काम सुरु होते.