पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीसॅट-३० उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इंटरनेट स्पीड वाढणार

जीसॅट-३०

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपकाच्या सहाय्याने शुक्रवारी यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. दक्षिण अमेरिकेच्या उत्तर-पूर्व किनारपट्टीवरील कैरो बेटावरुन या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. पहाटे २ वाजून ३५ मिनिटानं या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. २०२० मधील इस्त्रोचं हे पहिले मिशन असून ते यशस्वीरित्या पार पडले. या आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेट स्पीडला गती मिळणार आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सायन-माटुंगा दरम्यान रुळाला तडे

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, जीसॅट-३० हा एक दूरसंचार उपग्रह आहे. हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करणार आहे. इनसॅट-४ या उपग्रहाची मर्यादाही संपुष्टात येत असून तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. तसंच, इंटरनेट टेक्नोलॉजीमध्येही आमुलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे अधिक शक्तिशाली आणि आधुनिक उपग्रहाची आवश्यकता होती. त्यामुळेच इस्रोने जीसॅट-३०चं आज प्रक्षेपण केले आहे. 

मोदींच्या राज्यात तरुणाईवर तुरुंगवास भोगण्याची वेळ : प्रकाश

जीसॅट-३०मुळे भारताची दूरसंचार सेवा आणखी प्रभावी होणार आहे. तसंच इंटरनेट स्पीड वाढणार आहे. त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रात मोबाईल सेवा अजूनही पोहचल्या नाहीत त्या ठिकाणी मोबाईल सेवा पोहचवण्याचे काम या उपग्रहामुळे शक्य होणार आहे. दरम्यान, जीसॅट-३० या उपग्रहाचे वजन ३१०० किलो ऐवढे आहे.  हा उपग्रह प्रक्षेपणानंतर १५ वर्ष काम करत राहणआर आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असून त्यामुळे ऊर्जा मिळणार आहे.  

DSP देविंदर सिंहच्या प्रकरणावरुन राहुल गांधींचा मोदी-शहांवर