पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Chandrayaan-2 : असा असेल 'चांद्रयान २' चा पुढील प्रवास

चांद्रयान 2

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून 'चांद्रयान-२' सोमवारी अवकाशात झेपावलं. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. चंद्रावर यान उतरवण्याच्या मोठ्या मिशनची ही सुरुवात आहे. चांद्रयान २ श्रीहरिकोटा केंद्रावरुन चंद्रापर्यंत ३ लाख ८४ हजार किलोमीटर प्रवास करणार आहे. 

चांद्रयान-२ मुळे संपूर्ण देशाचा गौरव - पंतप्रधान

प्रक्षेपणानंतर अवघ्या १६ मिनिटांत यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले. त्यानंतर इस्रो प्रमुख के शिवन यांनी अपेक्षेपेक्षा चांगली सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया दिली.  यशस्वी कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनिय आहे की जवळपास ५० दिवसांनतर ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान यान चंद्रावर पोहचणार आहे.  

चांद्रयान १६ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार!

चांद्रायन २ भारताच्या सर्वात शक्तिशाली असलेल्या जीएसएलव्ही एमके -३ रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आले आहे. प्रक्षेपणानंतर १६ मिनिटातच चांद्रयान २ पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले. १६ दिवस पृथ्वी कक्षेत परिक्रमणा करत यान चंद्राच्या दिशेने प्रवास करेल. या दरम्यान यानाचा वेग हा अधिकाधिक १० किमी प्रति सेकंद तर कमीत कमी ३ किमी /प्रति तास इतका असेल. 

२१ दिवसांनंतर चंद्राच्या कक्षेत प्रवेश   

१६ दिवसांनंतर चांद्रयान २ पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले. यादरम्यान चांद्रयान २ पासून रॉकेट वेगळे होईल. त्यानंतर ५ दिवसानंतर चांद्रायन चंद्राच्या कक्षेत जाईल. यावेळी यानाचा वेग हा  १० किमी प्रति सेकंद आणि किमान ४ किमी प्रति प्रति सेकंद असेल. त्यानंतर यान उतरण्याची प्रक्रिया सुरु होईल.

चंद्राच्या भूपृष्ठावर स्पर्शापूर्वी काय होईल?

पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर जवळपास ३ लाख ८४ हजार किमी इतके आहे. चांद्रयान २ च्या माध्यमातून लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञान चंद्रावर उतरणार आहे. चंद्राच्या भूपृष्ठावर उतरण्यापूर्वी चार दिवस अगोदर रोवर विक्रम उतरण्याच्या जागेची रेकी करेल, लॅडर यानापासून वेगळा होईल. 'विक्रम' चंद्राच्या आणखी जवळ जावून उतरण्याचा जागेचा स्कॅनिंग करेल आणि लँडिंग प्रक्रियेला सुरुवात होईल. लँडिंगनंतर लँडर (विक्रम) चा दरवाजा उघडला जाईल.  रोवर बाहेर पडण्यासाठी जवळपास ४ तासांचा वेळ लागेल. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटानंतर इस्रोला चंद्रावरील छायाचित्रे मिळण्यास सुरुवात होईल. 
चांद्रयान- २ चे यशस्वी प्रक्षेपण; टीम इस्रोवर शुभेच्छांचा वर्षाव