पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इस्रोने कडून RISAT-2BR1चं प्रक्षेपण, भारतीय सैन्यासाठी ठरणार उपयोगी

इस्रोने कडून RISAT-2BR1चं प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून रिसॅट-२ बीआर १ चे प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही ४८ च्या मदतीनं रिसॅट-२ बीआर १ बरोबरच काही परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपणही करण्यात आलं आहे. रिसॅट-२ बीआर १ मुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे. 

हाफिज सईद मुंबई हल्ल्यातील आरोपीच, पाकिस्तानी कोर्टाने केले मान्य

रिसॅट-२ बीआर १  हा एक शक्तीशाली देखरेख करणारा कॅमेरा उपग्रह आहे. ज्यामुळे उंचीवरूनही चांगल्या दर्जाची छायाचित्र टिपता येणार आहेत. ज्याचा फायदा सीमेवरील निगराणीसाठीही होऊ शकतो. दिवस आणि रात्री देखील अत्यंत प्रभावीप्रणे रिसॅट-२ बीआर १  काम करणार आहे त्यामुळे सैन्याला सीमेवरील देखरेखीसाठी मदत होणार आहे. 

ज्वाला गुट्टाचा प्रशिक्षक गोपिचंद यांच्यावर गंभीर आरोप

रिसॅट-२ बीआर १ हा इस्त्रोकडून तयार करण्यात आलेला एक रडार  इमेजिंग अर्थ ऑर्ब्जवेशन उपग्रह आहे. या उपग्रहाचे वजन ६२८ किलो आहे. या उपग्रहाच्या मोहिमेचा अवधी पाच वर्षांचा आहे. कृषी, वन, आपातकालीन प्रतिबंध आणि सरंक्षण या क्षेत्रासाठी रिसॅट-२ बीआर १ चा मोठा उपयोग होणार आहे.

उन्नाव प्रकरण: आरोपींविरोधात चार्जशीट दाखल