पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पुढील १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नशील आहोत'

इस्रो प्रमुख सीवन

चांद्रयान २ च्या मोहिमेसंदर्भातील यशाची आस अद्याप कायम असल्याची माहिती इस्रो प्रमुख के. सीवन यांनी दिली आहे. शनिवारी रात्री विक्रम लँडरशी इस्रो मुख्यालयाचा संपर्क तुटला होता. शास्त्रज्ञांनी अजून हार मानली नसून विक्रम लँडरशी संपर्क करण्यासाठी पुढी १४ दिवस प्रयत्न करणार असल्याचे सीवन यांनी स्पष्ट केले. 

चांद्रयान 2 : मोहीम ९० ते ९५ टक्के यशस्वी : इस्रो

विक्रम लँडरशी पुन्हा सपंर्क होण्याची काही शक्यता आहे का? असा प्रश्न सीवन यांना विचारण्यात आला होता. यावर सीवन म्हणाले की, "आम्ही विक्रमशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढील १४ दिवस हे प्रयत्न सुरु राहतील." 
यावेळी त्यांनी चांद्रयान २ सोबत पाठवलेल्या ऑर्बिटवर देखील माहिती दिली.

विक्रम लँडर चंद्रावर उतरलेला असू शकतो, थोडा धीर धरा, इस्रोच्या माजी प्रमुखांचे मत

यापूर्वी ऑर्बिटरची क्षमता ही १ वर्षांपर्यत चालेल इतक अल्प होती. मात्र आता यामध्ये अतिरिक्त इंधनामुळे ऑर्बिटर ७ वर्षे कार्यरत राहिल. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यात यश आले तर मिशन शभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.