पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'चांद्रयान-२' च्या ९८ % यशानंतर इस्रोने हाती घेतलीय 'ही' मोहीम

इस्रो प्रमुख सीवन

चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क करण्यात इस्रोला यश आले नाही, असे इस्रो प्रमुख के.सीवन यांनी शनिवारी स्पष्ट केले. ऑर्बिटरची प्रक्रिया अगदी अचूकपणे सुरु असल्यामुळे चांद्रयान २ मोहीम ९८ टक्के यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले. ऑर्बिटरमध्ये एकूण आठ उपकरणे बसवण्यात आली असून ही सर्व उपकरणे अपेक्षितपणे कार्यरत आहेत. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपण मोठे यश मिळवले, असा दावा त्यांनी केला.  

दिपक पुनियालाही ऑलिम्पिक तिकीट, अखेरच्या ३० सेकंदात मारली बाजी

यानंतर इस्रोने आपला मोर्चा आता नव्या मोहिमेकडे वळवला आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत भारत आणि इस्रोचे मानरहित यान अवकाशात झेपावणार आहे. १० हजार कोटींच्या या मोहीमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी घोषणा केली होती. या नव्या मोहिमेबद्दल, सिवन म्हणाले की, देशाच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ताकद सिद्ध करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण आहे.

काँग्रेसच्या 'संकटमोचका'वरील संकट अजूनही कायम

गगनयान जूलै २०२१ मध्ये अवकाशाच्या दिशेने झेपावणार आहे. हवाईदल आणि इस्रो संयुक्तपणे या मोहिमेवर काम करत आहेत. तीन अंतराळवीरांना घेऊन यान अवकाशात झेपावणार आहे. हे अंतराळवीर ७ दिवस अवकाशात प्रवास करतील. यासाठी २५ वैमानिक शॉर्टलिस्टेड करण्यात आले असून अंतिम तिघांची निवड करुन इस्रो त्यांना अवकाश मोहिमेसंदर्भात प्रशिक्षण देणार आहे.