पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वेगाड्यातही विलगीकरण कक्ष तयार, कोचमध्ये अनेक बदल

रेल्वेत तयार करण्यात आलेले विलगीकरण कक्ष

कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आता भारतीय रेल्वेही पुढे आली आहे. भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भारतीय रेल्वेने आपल्या काही गाड्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. गरज पडल्यास या कक्षांमध्ये रुग्णांना दाखल करता येऊ शकेल. यासाठी या रेल्वे गाड्यांच्या कोचेसमध्ये काही तात्पुरते बदलही करण्यात आले आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

पुणे: विभागीय आयुक्तांनी जपली माणुसकी, ज्येष्ठ नागरिकांना केली मदत

रेल्वेच्या शयनयान कोचेसमध्ये हे कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी केवळ एकच व्यक्ती राहू शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी वरच्या बर्थवर जाण्यासाठी असलेले शिडीही काढून टाकण्यात आली आहे. या कोचमध्ये असलेल्या बाथरूममध्येही बदल करण्यात आले आहेत. तिथे आंघोळीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

फेसबुक न वापरणाऱ्यांनाही FB Live ऐकता येणार, नवे फिचर

भारतात या आजाराचा तिसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये समूह संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्या स्थितीत रुग्णांचा आकडा वाढेल. म्हणूनच तयारीचा भाग म्हणून सर्व यंत्रणा सध्या सज्ज झाल्या आहेत. भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ८३४ वर जाऊन पोहोचली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Isolation coaches have been prepared by the Indian Railways to fight the Coronavirus Pandemic