पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA : आंदोलनात ISIS चा हात? काश्मिरी दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

काश्मीरच्या दांम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेट इन खोरासन प्रॉव्हिन्स (आयएसकेपी) या संघटनेशी संलग्नित असलेल्या काश्मीरच्या एका जोडप्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयएसकेपीच्या संघटनेतील काही लोकांसोबत मिळून दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलन भडकवण्यामागे या दाम्पत्याचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एका खास मोहिमेअंतर्गत या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

कोण आहे PM मोदींच्या टि्वटर हँडलवरुन

काश्मीर निवासी असलेला जहांजीब सामी आणि त्याची पत्नी हिंडा बशीर बेग अशी या दोघांची नावे आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओखला येथील जामिया नगर परिसरातून एका दांम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. दोघांचा आयएसआयएसच्या खुरासान मॉड्यूलशी संबंध असल्याचा संशय व्यक्त पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन लोकांना भडकवण्याचे काम पती-पत्नी मिळून करत होते, असा संशय ही पोलिसांना आहे. यासंदर्भात अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला असून सीएए विरोधातील आंदोलनाला आता आणखी एक वेगळे वळण लागण्याचे संकेत मिळत आहेत.  

केरळमधील एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण

राजधानी दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात आंदोलन सुरु आहे. जामियातील शाहिन बाग परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. आंदोलकांनी नोएडा-दिल्लीला जोडणारा एक मार्गही बंद करुन ठेवला आहे.