पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इरफान खान यांच्यावर कुटुंबीय आणि मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

इरफान खान

प्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचे बुधवारी निधन झाले. प्रकृती खालावल्यानं त्यांना मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, ते अतिदक्षता विभागात होते. वर्सोव्यातील कब्रस्तानात दुपारी तीन वाजता त्यांचा दफनविधी पार पडला. कुटुंबीय आणि मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.

 त्यांना २०१८ मध्ये न्युरोएंडोक्राईन ट्यूमर हा आजार झाला. अत्यंत दुर्धर आजारावर मात करुन ते परतले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाचे चित्रीकरणही  पूर्ण केले. मकबूल, पानसिंह तोमर, द लंच बॉक्स, हिंदी मीडियम, कारवाँ, पिकू सारखे त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरले. अंग्रेजी मीडियम हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

माझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता

२०११ साली त्यांना भारत सरकारकडून कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. २०१३ साली आलेल्या पानसिंग तोमर चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.

एनएसडी पासून इरफान यांच्यासोबत असलेले निर्माते तिग्मंशु धुलिया यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. मला खूप वाईट वाटतंय की त्याच्यावर अत्यंत साधेपणानं अत्यंसंस्कार झाले.  मुंबईत असून देखील त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जाता आलं नाही हे दुर्देव आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

चारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन