पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराणने अमेरिकन सैन्याला 'दहशतवादी' घोषित केले

जनरल सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती. (REUTERS)

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे आघाडीचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराणमध्ये शोकाकुल वातावरण असून दुसरीकडे संतापही मोठ्याप्रमाणात व्यक्त होत आहे. याचदरम्यान इराण संसदेत अमेरिकन सेना आणि पेंटागनला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या बाजून मतदान झाले. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, खासदारांनी सुलेमानी यांच्या हत्येविरोधात हा प्रस्ताव संमत केला. अमेरिका आणि इराणचे आघाडीचे नेते सध्या एकमेकांविरोधात वक्तव्ये करत आहेत. 

'काश्मीरला भारत मुक्त करा असे म्हटले तर खपवून घेणार नाही'

इराणमधील माध्यमांनुसार, विधेयक संमत करण्यापूर्वी अमेरिका आणि इस्त्रायलवर टीका केली. खासदारांनी सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची आणि अमेरिका-इस्त्रायलला धडा शिकवण्याचा संकल्प केला. तत्पूर्वी, पाच जानेवारीला संसदेत खासदारांनी अमेरिकेच्या खात्म्याच्या घोषणा दिल्या होत्या. तत्पूर्वी, सोमवारी सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेदरम्यान हजारो लोक तेहरानच्या रस्त्यावर उतरले होते. हातात पोस्टर घेऊन लोकांनी अमेरिका आणि इस्त्रायलविरोधात घोषणाबाजी केली. 

पाच वर्षांत फडणवीसांनी महाराष्ट्र ओरबाडून टाकला, अनिल गोटेंचा आरोप

तेहरान विद्यापीठात सुलेमानी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात लोक आले होते. आपल्या कमांडरला अखेरचा निरोप देताना देशाचे सर्वोच्च नेते खामेनी भावूक झाले होते. त्यांना अश्रू अनावर झाले होते.