पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची दहशत: इराणने ८५ हजार कैद्यांना सोडले

इराणचे राष्ट्राध्यक्ष

कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इराणने राजकीय कैद्यांसह जवळपास ८५ हजार कैद्यांना तात्पुरते सोडले आहे. मंगळवारी इराण सरकारने याबाबत माहिती दिली. न्यायालयीन प्रवक्ते घोलमोहसिन इस्माइली यांनी सांगितले की, सोडण्यात आलेल्या कैद्यांपैकी निम्मे कैदी देशाच्या सुरक्षेशी संबंधित होते. त्याचसोबत, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तुरूंगात योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत, असे देखील त्यांनी सांगितले. 

सरकारी कर्मचारी ऑन ड्युटी अन् लोकलही ऑन टाइम, पण...

इराणच्या एका सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये सोमवारी एकाच दिवसात कोरोना विषाणूमुळे १२९ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढून ८५३ झाला आहे. तर इराणमध्ये १४ हजार ९९१ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. इराणमधील एक वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही : उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी इराणने सोमवारी देशातील चार महत्त्वाचे शिया धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला. पुढील आदेश मिळेपर्यंत मशहद येथील इमाम रझा, कौम येथील फातिमा मासुमा आणि तेहरान येथील शाह अब्दुल-अझिम बंद ठेवण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्याचसोबत कौम येथील जमकरान मशीद देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना: गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट १० वरुन ५० रुपये