पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराकमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणचा हल्ला, १२ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली

इराकमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणचा हल्ला, १२ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली

कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिका दरम्यान प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यातच इराणने इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ला केल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. इराकमध्ये अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने क्षेपणास्त्र डागले आहेत. पेंटागनने हल्ल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या हवाई तळावर एक डझनहून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. हवाई तळावर अमेरिकेबरोबर आघाडीचे सैन्यदलही तैनात आहेत. या हल्ल्यात अनेक अमेरिकन सैनिक मारले गेल्याचा दावा इराणणे केला आहे.

अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सुमारे साडेपाच वाजता इराकमध्ये अमेरिका सैन्य असलेल्या हवाई तळांवर एकापाठोपाठ एक असे क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे पेंटागनने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत अजून समजू शकलेले नाही.  

यापूर्वीही इराणने अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला केला होता. त्यानंतर बगदादमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. कासिम सुलेमानी हे इराणचे आघाडीचे नेते होते.